स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक,श्री. शैलेश बलकवडे सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना समांतर तपास करणे बाबत आदेशित केले होते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथके नेमूण सक्त पेट्रोलींग करुन गोपनीय व तांत्रिकरित्या माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन घडणारे गुह्यांना प्रतिबंध करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या.मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले तसेच पोलीस अमंलदार श्रीकांत मोहिते, रामचंद्र कोळी, अनमोल पवार, वैभव पाटील व विनोद कांबळे यांचे पथक नेमले.
सदर पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने गुन्हे घडलेची ठिकाणे, वेळ व पध्दत याचा अभ्यास करून तपास करीत असताना सदर तपास पथकास गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शिरोली MIDC पोलीस ठाणे, गु.र.नं. 183/2022, भा.द.वि.स. क. 454,457,380 प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णात पोतेकर, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असून ते नमुद गुन्ह्यातील चोरलेल्या सेंट्रिग प्लेटांपैकी काही सेंट्रिंग प्लेटा विक्री करणे करीता मोटर सायकलवरून शिरोली गावचे हद्दीत असले एनएच-4 ते अल्ट्राटेक RMC प्लॅट कोल्हापूर कडे जाणारे रोडवरील राम सिंटरड प्रोडक्टस् जवळ येणार असले बाबत माहिती मिळाली. मिळाले माहितीवरून वरील तपास पथकाने 01 )कृष्णात प्रकाश पोतेकर, व.व. 23, रा. गल्ली नं.3, जामदार मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर 02 ) गुरुराज मालतेश अतनुरे, व.व. 23, रा. अष्टविनायक कॉलनी, उलपे मळा, कसबा बावडा, कोल्हापूर, 03) अक्षय विजय भोसले, व.व. 26, रा. रामनगर, शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 04) निलेश उर्फ सोम्या शिवाजी राऊत, व.व. 28, रा. जाधव गल्ली, शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 05 )मोसीन जमीर मोमीन, व.व. 24, रा. म्हसोबा मंदीराजवळ, रिंगरोड,
लालनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 06)विक्रम दिपक सोनुले, व.व. 20, रा. गल्ली नं.2, बालाजी कॉलनी, पाटील मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांना पकडले असता त्यांचे कब्जात चोरीच्या सेंट्रिंग प्लेटा, जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल चोरीची मोपेड, राऊटर, ब्लुटूथ तसेच गुन्हा करणेकरीता वापरलेल्या मोटर सायकली मिळून आल्या. नमुद इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांचे कब्जात मिळालेल्या सेंट्रिंग प्लेटा या शिरोली MIDC येथून चोरल्या असल्याचे सांगून त्यांनी नमुद गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी शिरोली MIDC येथे घरफोडी चोरीचा, राजारामपुरी येथे मोटर सायकल चोरीचा, इचलकरंजी येथे जबरी चोरीचा व शिरोळ येथे दोन घरफोडी चोरीचे असे एकूण 05 गुन्हे केले असलेची कबुली दिली आहे. सदर आरोपीत यांचेकडे सखोल तपास करून त्यांचेकडून त्यांनी जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल चोरीची मोपेड, राऊटर, ब्लुटूथ, सेंट्रिंग प्लेटा व गुन्हा करणे करीता वापरलेल्या 02 मोटर सायकल असा एकूण 2,10,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून शिरोली MIDC, राजारामपुरी व शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील प्रत्येकी एक-एक व शिरोळ पोलीस ठाणेकडील दोन असे एकूण 05 गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी शिरोली MIDC पोलीस ठाणे येथे जमा करणेची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे सो व अपर पोलीस अधीक्षक,श्री. तिरूपती काकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय गोर्ले, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस उपनिरीक्षक नेताजी डोंगरे तसेच पोलीस अमंलदार श्रीकांत मोहिते, रामचंद्र कोळी, अनमोल पवार, वैभव पाटील, विनोद कांबळे, असिफ कलायगार, उत्तम सडोलीकर, संजय पडवळ, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर, रफिक आवळकर, अनिल जाधव व सायबर पोलीस ठाणे कडील अमर वासुदेव यांनी केली आहे.