अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे मध्ये जागतिक औषध निर्माता दिना निमित्तफार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले .

या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम महाविद्यालया कडून राबविण्यात आले


प्रेस मीडिया लाईव्ह :

अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे मध्ये जागतिक औषध निर्माता दिना निमित्त दिनांक १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत फार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम महाविद्यालया कडून राबविण्यात आले. दिनांक १९ रोजी डॉ. अनंथ नागाप्पा यांचे 'कम्युनिटी कनेक्ट विथ फार्मसी ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  

दिनांक २१ रोजी रजिस्टर्ड फार्मासिस्ट माजी विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रजिस्टर्ड फार्मासिस्ट माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी "रिटेल फार्मसी" या विषयावर आयोजित कार्यशाळेत आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दिनांक २२ रोजी शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन, एच. डी. एफ. सी. बँक, शाखा मलकापूर आणि संजीवन ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष मा. श्री. भारतेश कळंत्रे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी, तालुक्यातील फार्मासिस्ट, एच. डी. एफ. सी. बँक शाखा मलकापूर चे अधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास केमिस्ट असोसिएशन, एच. डी. एफ. सी. बँक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला.

दिनांक २३ रोजी साळशी ता. शाहूवाडी येथे अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वाठार तर्फ वडगाव यांच्या सहयोगाने मोफत पेशंट कौंसलिंग आणि हेल्थ चेक-अप कॅम्प चे आयोजन करण्यात आले. कॅम्प मध्ये साळशी गावातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. कॅम्प मध्ये अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या डॉ. प्रियांका माने, डॉ. प्रणिता पेहेकार, डॉ. सुचित्रा दास. आणि स्टाफ नर्स प्रियांका कांबळे यांनी साळशी गावातील नागरिकांची तपासणी केली. 

दिनांक २५ रोजी जागतिक औषध निर्माता दिना निमित्त अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे आणि शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांनी संयुक्त पणे 'भव्य पदयात्रेचे' आयोजन मलकापूर ता. शाहूवाडी येथे करण्यात आले. पदयात्रेचे उद्घाटन अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे चे प्राचार्य डॉ. अभिजित श. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मलकापूर एस. टी. स्टँड ते मलकापूर नगरपरिषद पर्यंत भव्य पदयात्रे चे आयोजन  करण्यात आले होते. मलकापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'औषध निर्मात्याचे महत्त्व' या विषयावर पथनाट्यचे सादरीकरण केले. यानंतर उपस्थित शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी, तालुक्यातील फार्मसिस्ट, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यांनी "औषध निर्मात्याची प्रतिज्ञा" घेतली आणि  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाविद्याया कडून वर्षभर या सारखे विविध सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम राबविले जातात. 

सदर फार्मसी सप्ताहा साठी संस्थेचे *अध्यक्ष मा. श्री. विजयसिंह माने साहेब, मा. सौ. मनीषा विजयसिंह माने वहिनी आणि प्राचार्य डॉ. अभिजित श. कुलकर्णी* यांचे पूर्णतः मार्गदर्शन लाभले. फार्मसी सप्ताहाचे नियोजन सहा. प्रा. आझाद ढगे, सहा. प्रा. सुमित शिंदे, सहा. प्रा. विद्या काकडे, सह. प्रा. सुनील कराळे, सहा. प्रा. राहुल कांबळे, सहा. प्रा. राजेश कुलकर्णी, सहा. प्रा. अविनाश चव्हाण, सह. प्रा. उमेश जिरोळे, सहा. प्रा. ऐश्वर्या कांबळे, सहा. प्रा. योगेश फसाले, सहा. प्रा. कोमल कांबळे, सहा. प्रा. दिपाली पाटील, श्री. अनिल पाटील, श्री. महेश कुंभार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post