प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर तर्फे कर्णबधीर दिनाचे औचित्य साधून जनजागृती तसेच नवजात बालकांची OAE चाचणी घेण्यात आली. सावित्रीबाई फुले रूग्णालय येथे सदर कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरवात क्लबचे प्रेसिडंट उदय पाटील यांनी स्वागत करून केले. डॉ. अभिजीत मुळीक यांनी OAE चाचणी संदर्भात माहिती दिली. OAE चाचणी कर्णबधीरत्वाचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी केली जाते. ही चाचणी कोणत्याही मॅर्टिनिटी हॉस्पीटल मध्ये करता येते. असे आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले. कार्यक्रमास डॉ. मंजुर्षी रोहिदास, डॉ. वर्षा पाटील, रोटरी करवीरचे दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, सातापा पाटील, प्रकाश माने, शितल दुग्गे,
प्रविणसिंह शिंदे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. निलेश भादूले यांनी इव्हेंट मॅनेजर म्हणुन काम पाहिले. तसेच सेक्रेटरी रो. स्वप्नील कामत यांनी सर्वांचे आभार मानले.