प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी गटाला धक्का देत महापौरपदाची निवडणूक जिंकणारे माजी महापौर महंमद गौस ऊर्फ बाबू हारून फरास (वय ७०) यांचे काल सायंकाळी निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी माजी महापौर हसीना फरास, दोन मुलगे माजी नगरसेवक आदिल व वासीम फरास, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (ता. १९) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Tags
कोल्हापूर