प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना कळंबा कारागृहात घडली आहे. दरम्यान कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले आहे.
ही घटना गुरुवारी पहाटे मध्यवर्ती कळंबा जेलमध्ये घडली. भरत बाळासाहेब घसघसे वय २९, रा. वाडकर गल्ली, आष्टा, जिल्हा सांगली असे त्याचे नाव आहे . मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कैद्याने जीवन संपवल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले आहे. कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक सात शौचालयालगत असलेल्या भिंतीजवळ आत्महत्या केल्याचा प्रकार पहाटे उघड झाला. कळंबा कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पहाटे घटना स्थळाची पाहणी करून उतरणीय तपासण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला
गर्दी, मारामारीसह बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगल्या प्रकरणी भरत घसघसेविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. २०१९ मध्ये घसघसेसह सहा साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. आज मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कळंबा कारागृहातील अन्य कैद्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर जेलचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.