प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-निम्रिती विचार मंच व साहीत्यीक संघटना तर्फे प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा अमृत महोत्सव समितीतर्फे नागरी सत्कार व ग्रंथ तुला करण्यात आली. भारतीय जनता पक्ष व आरएसएस हे देशाचे मोठे शत्रु आहेत. त्याच्यां कडून सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला जात आहे.त्याचा बिमोड करण्याची गरज आहे.
त्यासाठी जानेवारीत कोल्हापूर ते मुंबई मार्गांवर लॉगमार्च काढ़णार आहे,या चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी अपेक्षा प्रा.जोगेंद्र कवाडे यानी व्यक्त केली. यावेळी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी,अनिल म्हमाणे ,माजी महापौर भुपाल शेटे उपस्थित होते .अनिल म्हमाणे यांनी मनोगत व्यक्त केले.