महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सर्दी, खोकल्याची औषधे दुरापास्त, रुग्ण त्रस्त

  महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रातील सद्यचित्र: आठवडाभरात औषधांचा पुरवठा पूर्व पदावर येईल- अधिकृत सूत्रांची समाजमनला माहिती..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सध्या सर्दी आणि खोकला यासारख्या आजारांवर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. ज्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी या आजारावर औषधे उपलब्ध नाहीत अशा रुग्णांना तेथील आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर बाहेरील मेडिकल मधून औषधे विकत घेऊन घेऊन येण्याचा सल्ला देत आहेत.                                  

  महापालिकेची शहर आणि परिसरात एकूण 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी सदर बाजार, सिद्धार्थ नगर आणि मोरे माने नगर यांचा समावेश आहे. मात्र सध्या यापैकी काही केंद्रांवर सर्दी आणि खोकला या आजारावरील औषधांचा तुटवडा भासत असल्याचे वास्तव चित्र आहे. सध्या बदलेल्या  वातावरणामुळे सर्दी आणि खोकल्यांचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. आरोग्य केंद्रात निर्माण झालेल्या औषध तूटवड्या बाबतची खातरजमा समाजमन यूट्यूब चैनल ने केली आहे. राजारामपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्दी आणि खोकला आजारावर  तपासण्यासाठी रुग्ण गेले असता गेले असता,  या ठिकाणच्या डॉक्टर्सनी सर्दी आणि खोकल्याची औषधे नसल्याचे त्यांना सांगितले तसेच संबंधित औषधे घेण्याबाबतची चिठी लिहून देऊन ही औषधे बाहेरील मेडिकलमध्ये विकत घेऊन आणण्याचा सल्ला दिला. दरम्यान याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रामध्ये सर्दी आणि खोकला या आजारावरील औषधांची कमी जास्त, प्रमाणात कमतरता जाणवत आहे.  औषध खरेदी झाली नव्हती. तसेच टेंडर प्रक्रियेत फाईल होती. येत्या आठवडाभरात या औषधांचा पुरवठा होऊन परिस्थिती पूर्व पदावरील येईल. दरम्यान, महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवेमध्ये चांगले योगदान देत आहेत. अनेक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या रुग्णांना येथे चांगले उपचार मिळत आहेत, चांगले औषधही उपलब्ध होत आहेत. मात्र, सध्या सर्दी, खोकला यासारख्या आजारावर औषधांचा असणारा तुटवडा ही समस्या लवकरात लवकर दूर व्हावी, अशी रुग्णांची  जास्त नाही पण रास्त मागणी आहे.                      

    दरम्यान, महापालिकेच्या सावित्रीबाई रुग्णालयामध्ये दुपारी दोन नंतर जे सर्दी खोकल्याचे काही रुग्ण जातात.  त्यांनाही एकतर बाहेरून मेडिकल मधून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये येऊन औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण सावित्रीबाई फुले दवाखान्यातील मेडिकल दुपारी एक एक किंवा दोन पर्यंत उघडे असते. खरे तर सरकारी दवाखान्यांमध्ये मेडिकल हे किमान दिवसभर तरी उपलब्ध असायला हवे, अशीही मागणी रुग्णांकडून होत आहे.                  

   महेश गंगाराम गावडे.

Post a Comment

Previous Post Next Post