प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ प्रमोदीनी माने :
कोडोली येथे कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.. या वेळी सातवीच्या विद्यार्थीनी शिक्षकाची भूमीका साकारली व गुरूंच मानवी जिवनातील महत्व व शाळेतील शिक्षकांची कौतुकास्पद माहीती सांगण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या सामाजिक, शैक्षणिक, महिला सबलीकरण कार्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा प्रा, सौ प्रमोदिनी माने मॅडम लाभल्या त्यांनी मुंलीना शिक्षणाचा व्यवहारिक जगात कसे राहायचे तसेच विद्या विनयाने शोभते व प्रथम चांगला माणूस घडला पाहीजे त्यासाठी विचार चांगले पाहीजेत गुरूंचे महत्व अशा अनेक विषयाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सरांनी मान्यवरांच स्वागत केले , तर चरापले मॅडम यांनी आभार मानले.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले , सरस्वती पुजन व डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमासाठी कन्या शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक मुख्याधापक केकरे सर,मान्यवर माने मॅडम उपस्थीत होत्या विद्यार्थीनीचा उत्साह पाहून सर्वांचे मन भारावून गेल.