प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ सविता पाटील : कागल
कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलचे 34 विद्यार्थी Nmms परीक्षेत पात्र ठरले. त्यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी सम्मेद मगदूम, वेदांत पाटील, अनुष्का आंबी, कार्तिक पिंपळे, श्रावणी चौगुले, मितेश बुरसे, तनिष्का धनवडे, किशोरी करपे या 8 विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वी पर्यंत वार्षिक 12000 × 4 वर्षे प्रमाणे एकूण 48000 रु प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळते.
राजश्री शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था ( सारथी) शिष्यवृत्तीसाठी विरेंद्र मगदूम, सत्यजित खराडे, ओजस्विता जाधव, आदित्य तेलवेकर, चेतन पाटील, अश्वित पाटील, आदर्श पाटील, समर्थ संकपाळ, सिद्धी पाटील, हार्दिक पाटील, प्रतिक्षा निकम, राजलक्ष्मी पाटील या 12 विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वी पर्यंत वार्षिक 9600 रु × 4 वर्षे प्रमाणे एकूण 38400 रु प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळते.
या विद्यार्थ्यांना सौ. सविता चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक श्री. एस . डी. खोत सर आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम व्ही. वेस्वीकर यांचे प्रोत्साहन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत मा. समरजितसिंह घाटगे, श्रीमंत मा. सौ. नवोदिता घाटगे यांची प्रेरणा मिळाली.