श्रींची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्यामुळे इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्यावतीने पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनचा यथोचित सत्कार केला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूकी करीता इचलकरंजी महापालिका प्रशासन व इचलकरंजी पोलीस प्रशासनाने नेटके नियोजन व चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे श्रींची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.


 सकाळी 11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शहर वाहतूक शाखेपासून मानाच्या गणपतीची मिरवणूक जिल्हाधिकारी मा श्री राहुलजी रेखावर साहेब,जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री डॉ शैलेशजी बलकवडे,महापालिकेचे आयुक्त मा सुधाकरराव देशमुख,खासदार मा धैर्यशीलदादा माने,आमदार मा प्रकाशजी आवाडे,प्रांत अधिकारी डॉ विकास खरात,अपर तहसीलदार मा शरद पाटील या  मान्यवरांच्या हस्ते व धनगरी ढोल व ताशा अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात सुरु झाली ते रात्री 12 वाजता सर्व सार्वजनिक मंडळांनी आपले सर्व वाद्य बंद करून सदर मिरवणूक  शांततेत सकाळी 7:00 वाजता पंचगंगा घाटावर समाप्त केली.*

    इचलकरंजी शहरातील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडल्यामुळे इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे वतीने महापालिकेचे आयुक्त मा सुधाकर देशमुख,उप आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल व पोलीस प्रशासनातील अपर पोलीस अधीक्षक मा जयश्रीजी गायकवाड मॅडम,पोलीस उपअधीक्षक मा श्री बी बी महामुनी,प्रांत अधिकारी मा श्री डॉ विकास खरात,शिवाजी नगरचे पोलीस निरीक्षक मा श्री महादेव वाघमोडे, गावभागचे पोलीस निरीक्षक मा श्री राजू ताशीलदार,शहापूर चे प्रभारी अधिकारी मा श्री अभिजित पाटील,शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी मा श्री विकास अडसूळ,सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख,उपनिरीक्षक मा हिना शेख मॅडम,पोलीस उपनिरीक्षक मा अश्विनी वायचळ मॅडम,तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून सत्कार केला.

    याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव श्री शशांक बावचकर,शहर अध्यक्ष श्री संजय कांबळे, श्री राहुल खंजिरे ( युवा नेते) उपाध्यक्ष श्री बाबासो कोतवाल,युवा अध्यक्ष श्री प्रमोद खुडे,अल्पसंख्याक अध्यक्ष श्री समीर शिरगावे,भटक्या व विमुक्त जाती- जमातीचे  अध्यक्ष श्री रवि वासुदेव,प्रमोद नेजे,दिलीप पाटील,ओंकार आवळकर उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post