प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी (प्रतिनिधी) : आॕल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली या संस्थेचे संस्थापक/ चेअरमन मा. डॉ. एम. यु. दुआ यांच्या सहीनीशीचे प्रमाणपत्र माणकापूर ता.निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार- श्री शिवाजी विठ्ठल येडवान यांना कर्नाटक प्रेस सेक्रेटरीपदीचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष- मा. दत्ता मांजरे, तारदाळकर- इचलकरंजी यांचे हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी सौ. सुवर्णा मांजरे, सौ. सुनिता मांजरे, सागर मांजरे, समर्थ मांजरे, सिध्दु मांजरे उपस्थित होते.
या निवडीबद्दल मा. दिलावर मकानदारसो, श्रीकांत कांबळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिवाजी येडवान यांची प्रेस सेक्रेटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.