अलायन्समध्ये मेंदू - मणका तपासणी शिबीरास चांगला प्रतिसाद



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे अलायन्स रुग्णालयात प्रसिद्ध मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ.अनिरुध्द मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या मेंदू व मणका तपासणी शिबीरास रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी डॉ.अनिरुध्द मोहिते यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन योग्य औषधोपचार केले.


इचलकरंजी येथील अलायन्स रुग्णालयात विविध आजारांवर वैद्यकीय तज्ञांमार्फत चांगले उपचार केले जातात.याशिवाय वैद्यकीय क्षेञातील तज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांवर शिबीर आयोजित करुन गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळवून दिला जातो.त्यामुळे या रुग्णालयाने चांगली आरोग्य सेवा देत

रुग्णांबरोबर नागरिकांमध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे. रुग्णांना माफक दरामध्ये चांगली व तत्पर वैद्यकीय उपचार सेवा देण्यासाठी या रुग्णालयातील डॉक्टर व सर्वच स्टाफ कायम कार्यरत असतो.नुकताच या 

रुग्णालयात प्रसिद्ध मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ.अनिरुध्द मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या मेंदू व मणका तपासणी शिबीरास सुमारे ४० रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी डॉ.अनिरुध्द मोहिते यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन योग्य औषधोपचार केले.त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

या शिबीरात सहभागी झालेल्या काही गरजू रुग्णांची शस्ञक्रिया याच रुग्णालयात डॉ.अनिरुध्द मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालीअत्यंत माफक दरामध्ये करण्यात येणार असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post