प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झपाटय़ाने होत असल्याने मोठ्या प्रमाणात घर बांधकामे होत असतात. घरांच्याबांधकामा साठी बांधकाम परवाना हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने मिळकत धारकांना विविध अडचणी येत असतात. तथापी यापुढे इचलकरंजी शहरातील ० ते १५० चौरस मीटर क्षेत्रा पर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी महानगर पालिकेकडील बांधकाम परवाना आवश्यक नाही. यासाठी खालील प्रमाणे नोंदणी कृत इंजिनिअर यांचे मार्फत
१) जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे
२)रेखांकन नकाशा
३)बांधकाम नकाशा
४)नोंदणी कृत इंजिनिअर यांचे बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीशी
सुसंगत असलेचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे या प्रकारे सर्व कागदपत्रा सह अर्ज ऑनलाईन सादर केलेनंतर विकास शुल्क, उपकर इत्यादी आवश्यकते शुल्क महानगरपालिकेकडे ऑनलाईन भरलेनंतर तयार होणारी पावतीच बांधकाम परवानगी समजणेत येईल.
तसेच १५० ते ३०० चौरस मीटर क्षेत्रा पर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी अर्जासोबत वरील प्रमाणे सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेनंतर महानगर पालिकेकडुन १० दिवसांत आवश्यकते शुल्क भरणेबाबत कळविण्यात येईल..आवश्यकते शुल्क भरल्यानंतर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देणेत येईल.या प्रकरणी कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही
यामुळे बांधकाम परवान्यासाठी शहरातील नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही.आणि शहराचा विकास आणि विस्तारीकरण झपाट्याने होण्यास मदत होणार आहे. तरी शहरवासीयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर रचनाकार रणजित कोरे आणि प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख याचे कडून करणेत येत आहे.