माहितीचा अधिकार अधिनियम, कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती नागरिकांच्या पर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
२८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती विविध माध्यमांच्या द्वारे जास्तीत जास्त नागरिकांच्या पर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. या अनुषंगाने माहिती अधिकार विषयी व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करणे बाबतच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. यानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी *प्रभारी अधिकारी तथा प्रशासक *सुधाकर देशमुख* यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. दुर्गेश वळवी* समाजशास्त्र विभाग, सायबर इन्स्टिट्यूट, कोल्हापूर. यांचे माहिती अधिकार या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी डॉ. दुर्गेश वळवी यांनी माहिती अधिकार अधिनियम कायद्याची विस्तृत माहिती दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.सुधाकर देशमुख यांनी सुशासन निर्माण होण्यासाठी कायद्यास अनुसरून देता येत असणारी माहिती अर्जदारास देणेत यावी अशा सुचना दिल्या.
याप्रसंगी माहिती अधिकारी तसेच उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकाचे समाधान प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख आणि व्याख्याते प्रा.डॉ. दुर्गेश वळवी यांनी केले.
या व्याख्यानासाठी सर्व प्रथम अपिल अधिकारी, जन माहिती अधिकारी तसेच माहिती अधिकाराचे काम पाहणारे सर्व कर्मचारी आणि शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.