सर्व श्रमिक महासंघाचे धोंडीबा कुंभार बटकणंगले भूषण पुरस्काराने सन्मानित

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांना बटकणंगले येथे उत्कर्ष मंडळाच्या वतीने सामाजिक परिवर्तन कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल बटकणंगले भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सेवानिवृत्त कॅप्टन रविंद्र मंडलिक यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले गावचे सुपूञ असलेले धोंडीबा कुंभार हे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह आरोग्य सेविका , बांधकाम कामगार ,यंञमाग कामगार यासह कष्टकरी, श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.याशिवाय सामाजिक प्रबोधनपर लेखन व सामाजिक परिवर्तन कार्यातही त्यांचा अत्यंत हिरीरीने सहभाग असतो.महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सर्व सहका-यांच्या मदतीने त्यांची समाजातील उपेक्षित , वंचित घटकांच्या न्याय हक्काची लढाई ही समाज विकासात मोठे योगदान देणारी ठरली आहे.या कार्याची दखल घेऊनच त्यांना बटकणंगले येथे उत्कर्ष मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून बटकणंगले भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सेवानिवृत्त कॅप्टन रविंद्र मंडलिक यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार त्यांनी सहकुटूंब स्विकारला.

याच वेळी बटकणंगले गावचे सुपूञ असलेले लक्ष्मण पाटील यांना पालघर जिल्ह्यात वाडा येथे शैक्षणिक कार्याबरोबरच आदिवासींच्या विकासासाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.दीपक कदम व समीर पाटील यांनी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी सरपंच सुरेश जाधव , पोलीस पाटील अमृत कांबळे ,सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव पाटील ,मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील , उपाध्यक्ष अमित शेवाळे ,सचिव स्वरुप पाटील , राजेश पाटील , खजिनदार राहुल गडकरी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ,विविध मान्यवर ,मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान ,या पुरस्काराबद्दल धोंडीबा कुंभार यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post