दैनिक ग्रामदेवताचे संपादक सखाराम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे मंगळवार  दिनांक ०६/०९/२०२२ रोजी स्वरतरंगआर्केस्ट्रा व स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या वतीने संगीत गणेशोत्सव फेस्टिवल २०२२ अत्यंत_दिमाखात साजरा झाला.  या वेळी दैनिक ग्रामदेवताचे संपादक सखाराम जाधव यांचा  पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. एन .डी .चौगुले  प्रा. सौ शारदा लव्हटे, सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजली आगलावे व स्वतरंगऱचे संस्थापक अध्यक्ष कोरे  ,डॉ. शुभांगी कोरे, संचालक वैभव माळी ,संचालिका सौ भक्ती माळी व इतर संचालकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात एका भक्ती गीताने करण्यात आली ,  विठ्ठल‌ आवडी प्रेमभाव यानंतर करा ओके ट्रॅक वर कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर गीते सादर करून रसिकांना उत्तम पर्वणी सादर केली .

या कार्यक्रमात सर्व प्रकारचे गायन शैली अनुभवास मिळाली. व्यावसायिक कलाकारांच्या प्रमाणे स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. खास करून आज सांगलीहून श्री दीपक साळुंखे व विजया पाटील हे गायक उपस्थित होते यांनीही उत्कृष्ट गायन सादर करून रसिकांची मनी जिंकली प्रत्येक वर्षी अशाच फेस्टिवलचे आयोजन केले जाईल असे मनोगत स्वरतरंगचे संस्थापक अध्यक्ष श्री कोरे  यांनी व्यक्त केले. उत्कृष्ट गायन केलेल्या कलाकारांनां मान्यवरांच्या हस्ते  भगवत गिता,शिवप्रतिमा व प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.दोन्ही दिवशी चहापान नाष्टा, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम, उत्कृष्ट डेकोरेशन, लाईट व्यवस्था करून संगीतमय वातावरण निर्माण केले गेले होते. यामुळे रसिकांना संगीतमय पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वरतरंग परिवाराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post