प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदिनी माने :
इचलकरंजी- येथील कु. शर्वरी अविनाश महादार या विद्यार्थीनीने अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे या शिक्षणसंस्थेमध्ये बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या पदविका परिक्षेत डिस्टिंक्शन गुणांसह उत्तीर्ण होऊन टाॅप टेन यादीमध्ये नंबर पटकावला आहे.
कु.शर्वरीची विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे तिने कला, अभिनय, निवेदन, खेळ इत्यादी क्षेत्रात प्राविण्य मिळवत घरच्यांच्या कष्टमय व संघर्षाच्या परिस्थितीत हातभार लावत हे यश संपादन केले आहे. तिला या काॅलेजचे प्राचार्य- डॉ.अभिजित कुलकर्णी सर, सर्व शिक्षकवृंद व आॕफीस स्टाफ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या अगोदर व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे अकरावी व बारावीची "आदर्श विद्यार्थिनी" म्हणून तिने बहुमान मिळविला आहे. तिच्या या यशात तिचे आई-वडील, भाऊ- संदीप बेलेकर, अमित बेलेकर, वैशाली शिरसागर, मामा- विनायक भंडारे, आजी- मालती भंडारे यांचा मोठा वाटा आहे. कु.शर्वरी ही इचलकरंजी येथील उद्योजिका व सिने कलाकार- वंदना भंडारे यांच्या बहिणीची मुलगी आहे.