प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.माजी उपप्राचार्य अशोक दास यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
इचलकरंजी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.तसेच दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात येते.यंदाच्या वर्षीही या संघाने इचलकरंजी शहरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरव पुरस्कार जाहीर केले होते.नुकताच संघाच्या कार्यालयातशिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी उपप्राचार्य अशोक दास यांच्या हस्ते विविध गटामध्ये शिक्षक व शिक्षिकांना शिक्षक गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यामध्ये पूर्व माध्यमिक गट गौरी पावगी, प्राथमिक गट रजनी घोडके, माध्यमिक गट उमा जाधव, - उच्च माध्यमिक गट प्रा. राजाराम झपाटे, महाविद्यालयीन गट डॉ. विरुपाक्ष खानाज व विशेष पुरस्कार म्हणून संगीता बिरनाळे यांचा समावेश होता.
या वेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष मोहन पुजारी, उपाध्यक्षा श्रीमती भारती बुगड ,सचिव नरसिंह वझे , कोषाध्यक्ष जीवन कुलकर्णी , संचालक रामचंद्र नलवडे , दत्तात्रय ठाणेकर , मधुकर खटावकर , दिलीप कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते.