प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील माई बाल विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.रजनी राजेंद्र घोडके यांना जेष्ठ नागरिक सेवा संघाचा यंदाच्या वर्षीचा कर्तव्यनिष्ठ शिक्षिका हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.या पुरस्कार निवडीचे पञ संघाचे अध्यक्ष प्रा.मोहन पुजारी यांनी त्यांना पाठवले आहे.
या पुरस्काराचे सोमवार दि.१२ सप्टेंबर रोजी एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
माई बाल विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.रजनी घोडके या नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात.विशेषत: स्पर्धा परीक्षा ,क्रीडा व कला अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित व सक्षम करणे , यासाठी त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो.म्हणूनच एक प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका अशी त्यांची मोठी ओळख आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच इचलकरंजी जेष्ठ नागरिक सेवा संघाने त्यांना यंदाच्या वर्षीचा कर्तव्यनिष्ठ शिक्षिका पुरस्कार जाहीर केला आहे. सदर पुरस्काराचे सोमवार दि.१२ सप्टेंबर रोजी एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष प्रा.मोहन पुजारी यांनी सांगितले.यावेळी संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती भारती बुगड ,सचिव नरसिंह वझे , कोषाध्यक्ष जीवन कुलकर्णी यांच्यासह संचालक उपस्थित होते.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ.रजनी घोडके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.