वडिलांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमास दिला सामाजिक आयाम



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

आपली प्रिय व्यक्ती आपल्यातून निघून जाण्याच्या दुःखातून सावरत त्याला सामाजिक आयाम देण्याचे काम वस्त्रनगरीतील तरुणाईने केले.

जवाहरनगर परिसरातील स्नेहल माळी यांचे वडिल राजेंद्र नायकू माळी हे 2 वर्षापुर्वी निवर्तले आणि घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.असे असताना त्यांच्या पत्नी सविता माळी आणि मुलगी स्नेहल माळी यांनी प्रथम स्मृतिदिनास नातेवाईक तथा उपस्थितांना वृक्षवाटप केले.नुकताच दुस-या स्मृतिदिनानिमित्त माळी कुटुंबियाने परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि उपचार मार्गदर्शन शिबीर आयोजन केले होते. मानवी समुह सुखदुःखात एकत्र येतात तेव्हा त्यातूनही समाजोपयोगी काही घडावे असा पायंडा पाडण्यासाठी आदर्श कृती आवश्यक असतात,तशी ही कृती आहे. या तपासणीत 150 हून अधिक नागरिक सहभागी झाले. 

           या नेत्र तपासणीसाठी इन फिगो आयचे सुशांत शेवाळे आणि सहकारी यांचे सहकार्य लाभले. तर संयोजनात संविधान संवादक अमोल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे संघटक रोहित दळवी, दामोदर कोळी आदींनी पुढाकार घेतला. 

Post a Comment

Previous Post Next Post