त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
नागनाथ दिनकर कांबळे (मंगलनगर-कोंडिग्रे) हे दि. ३ सप्टेंबर रोजी काम संपल्यावर रात्री दुचाकीवरून घरी जात होते. गावच्या हद्दीत रात्री १२.२० वा. च्या सुमारास त्यांना अनोळखी तिघांनी थांबवून मारहाण केली. नागनाथ कांबळे यांची अॅक्टिव्हा गाडी जबरदस्तीने पळवून नेली. या बाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरुन नेलेली अॅक्टिव्हा गाडी आज हातकणंगले-सांगली बायपास रोडवर उमळवाड फाटा येथील राजा हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उमळवाड फाटा येथे सापळा लावून अमन मस्तान पटेल (वय २०, शिंदेमळा- खोतवाडी, ता. हातकणंगले) याच्यासह एका मुलास पकडून त्यांच्याकडून चोरुन नेलेल्या अॅक्टिव्हा गाडीसह एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अमन पटेल याने गुन्हयाची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, सपोनि किरण भोसले, अंमलदार रणजित पाटील, आयुब गडकरी, फिरोज बेग, चंदू नन्नवरे, आसिफ कलायगार, प्रशांत कांबळे, सायबर पोलीस ठाण्यातील अमर वासूदेव यांनी ही कारवाई केली.