दुकानातून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास
प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
पनवेल मधील कामोठे सेक्टर 10 मधून चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. कामोठे सेक्टर 10 मधील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला. यावेळी दुकानातून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आली.
मागील काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दुकानाला लागून असलेला गाळा दोन लोकांनी भाड्याने घेतला. त्यानंतर त्यांनी दोन गाळ्यांच्या मध्ये असलेल्या भिंतीला फोडण्यास सुरुवात केली. रात्री भिंतीला मोठा बोगदा पाडला आणि ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास केले. सोन्याच्या दागिन्यांचे कपाट फोडता न आल्याने सुदैवाने ते वाचले. मात्र, काही वस्तू आणि चांदी चोरून नेली.याबाबत सकाळी दुकान मालक दुकान उघडायला आल्यावर हा प्रकार समोर आला. त्यांच्या संपूर्ण घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांनी याबाबत माहिती दिली. यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त सुरेश मेंगडे आणि उपायुक्त शिवराज पाटील तसेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेसंदर्भात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही दृश्य कैद झाली आहेत. तसेच अजून काही आजू बाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाऊन चोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. ही घटना बघता परिसरात खळबळ माजली असून भाडेकरूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.