प्रेस मीडिया लाईव्ह:
जब्बार मुलाणी
भिगवण - स्टेशन ता . इंदापूर : ३ सप्टेबंर २०२२ आज दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने भैरवनाथ विद्यालय भिगवण स्टेशन शाळेतील ५ मुले आणि ५ मुली अशा १० दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे ( बॅग,वहया , पुस्तके , कंपास , परिक्षा पॅड , पाणी बॉटल ) वाटप करण्यात आले.
या १० विद्यार्थ्यांची शालेय फी सुद्धा भरण्यात येणार आहे . या कार्यकमाचे अध्यक्ष स्थानी भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य श्री .गावडे सर होते .दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने या शाळेला वेळोवेळी मदत करण्यात येईल आणि शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात येईल असे आश्वासन दिव्य समाज निर्माण संस्थेचे अध्यक्ष रमेश शितोळे - देशमुख यांनी दिले .
राजेश कुंभार ,मुनीर शेख ,अनिल गुणवरे ,विठ्ठल जामले,पांडुरंग ठोंबरे ,मेजर चंद्रकांत मेंगावडे,बाळासाहेब सातपुते,केशव ढवाण ,अंकुश शिर्के यांनी मुलांना दत्तक घेण्यासाठी सहकार्य केले .
यावेळी गणेश वाघमारे , भरत मोरे, अक्षय नांगरे , विजय गायकवाड , वळवीसर , मांड़े मॅडम ,आप्पा घोडे , तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते . कांबळे सरांनी सुत्रसंचलन आणि आभार मानले .