प्रेस मीडिया लाईव्ह :
गणेश राऊळ :
तुमचा पर्मनंट अकाउंट नंबर (PAN) कार्ड एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असतो. अनेक ठिकाणी याचा ओळख सिद्ध करण्यासाठी वापर होतो. तथापि, मुख्यत्वे याचा वापर तुमची गुंतवणूक, कर्ज, टॅक्स वा बिझनेस अॅक्टिव्हिटीला चेक करण्यासाठी केला जातो. गव्हर्नमेंट डाटानुसार आतापर्यंत 25 कोटींहून जास्त पॅन कार्ड होल्डर देशात आहेत. प्रत्येक पॅन कार्डमध्ये एक नंबर लिहिलेला असतो. यात तुमची महत्त्वपूर्ण माहिती असते. आज आम्ही याबाबत तुम्हाला माहिती देत आहोत.
https://chat.whatsapp.com/GeGJEVQbUqc6U4dNLpT5Q8
आधीचे 3 कॅरेक्टर
प्रत्येक पॅन कार्डमध्ये 10 कॅरेक्टरचा अल्फा-न्यूमॅरिक नंबर असतो. आधीचे तीन कॅरेक्टर इंग्रजीचे डिजिट असतात, उदा. AAA, ZZZ ते कार्डच्या सिरीजला रिप्रेझेंट करतात.
चौथे कॅरेक्टर
चौथे कॅरेक्टर पॅन कार्ड होल्डरच्या स्टेट्सला रिप्रेझेंट करते. उदा. C म्हणजे कंपनी, P म्हणजे पर्सन, H म्हणजे (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली), F म्हणजे फर्म, A म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन, T म्हणजे ट्रस्ट, B म्हणजे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, L म्हणजे लोकल अथॉरिटी, J म्हणजे आर्टिफिशियल ज्युरिडिक्शन पर्सन आणि G गव्हर्नमेंट.
पाचवे कॅरेक्टर
पाचवे कॅरेक्टर एकतर सरनेम (पर्सनशी संबंधित असेल तर) अथवा एन्टिटी (दुसऱ्या केसमध्ये) शी संबंधित असते.
सहा ते 9 कॅरेक्टर
सहाव्यापासून ते नवव्या कॅरेक्टरपर्यंत सिक्वेंशल नंबर्स (0001 से 9999) असतात.
10 वे कॅरेक्टर
शेवटचे डिजिट एक अल्फाबेट चेक डिजिट असते, जे कोणतेही लेटर असू शकते.