कासारवाडी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले
प्रेस मीडिया लाईव्ह :
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड दि.१६ : कासारवाडीतील मदरसा येथे सन्माननीय इंजिनीयर वसीम अकरम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारे विध्यार्थीनी इंग्रजी तुन भाषण करून सर्वाना मंत्र मुग्ध केले यात विशेष करुन दोन मुलांनी आपल्या मित्राकडे आपल्या घरातील पालकांनवर आपसात बोलताना म्हणतात कि माझे बाबा मला कुठे ही फिरण्यास घेऊन जात नाही ते मला वेळ ही देत नाही सकाळी जातात आणि मी झोपल्यावर घरी येतात त्यामुळे मी बाबांन वर खुप नाराज आहे, ते ऐकून त्याचा मित्र ही म्हणतो प्रत्येक घरात हीच बोंब परिस्थिती दिसते मित्रा, त्यामुळे मी ही आई बाबांनवर नाराज आहे तेवढ्यात एक अजून एक मित्र येतो तो दोघाची समजुत काढत म्हणतो तुम्ही आई बाबांन वर का ? नाराज होता नाराज होणे बरोबर नाही, तुम्हाला माहीत आहे का, बाबा किती कष्ट तुमच्यासाठी घेतात ते रोज धडपडत पैशे कमविण्यासाठी रोज कामाला जातात महिण्याचे तीस दिवस काम करतात तेव्हा जेमतेम पगार येतो व ते कसेबसे घर चालवतात आजारी असले तरी ते सुट्टी न घेता कामावर जातात पण बाबा कधी तुम्हाला सोडून जेवत ही नाही कधी स्वतः साठी नवीन कपडे देखील लवकर घेत नाही, पण सण ईद आले तर पहीले कपडे तुम्हाला घेतात स्वतः मात्र जुनेच कपडे घालतात त्याचा कमी पगार असला तरी ते तुम्हांला कधी उपाशीपोटी ठेवत नाही मग तुम्ही आई बाबांन वर नाराज होता हे ऐकून मग ते पोर बोलतात आम्ही आईबाबांचा असा कधी विचार केला नाही ते आमच्या साठी किती त्याग करतात आता आम्हाला कळाले कि आईबाबा आमचे किती चांगले आहेत, आमच्या शिक्षणा पासुन ते जेवण खावण कपड्यांची चिंता करतात आमचे शाळेचे फिस साठी ही ते उपाशी राहून आम्हाला शिक्षण देतात आता आम्ही कधीच आईबाबांन वर नाराज होणार नाही खरच आमचे आईबाबा महान आहेत असे म्हणतात या गोष्टी तेथे उपस्थितांचे डोळे भरून आल्या शिवाय राहत नाही, असे प्रत्येक विध्यार्थीयांनी वेगवेगळ्या भाषणात देश प्रेम दाखविले व आपल्या पूर्वजांनी किती बलिदान व त्याग केले तेव्हा आम्ही स्वतंत्र झालो असे मनोगत विध्यार्थीनी केले काही विध्यार्थीनी अरबी उर्दू इंग्रजी बोलुन सर्वाचे लक्ष वेधून घेतले या वेळी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले मी आज पर्यंत मदरसा काय आहे मला हे कळले नाही पण आज येथे येऊन मदरसा काय शिक्षण या विद्यार्थ्यांना देतात व विध्यार्थीयांचा मनात कसे देश प्रेमची भावना जगवतात हे मी आज पहिल्यांदा पाहीले असे शिक्षण जर प्रत्येककांना मिळाले तर देशात कधीच विषमता राहणार नाही, हे विद्यार्थी पुढील काळात देश घडवतील हे नक्की असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी इंजि. वसिम अकरम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की ते सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून केले असे मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहे मदरसांमध्ये शिक्षण केवल अरबी उर्दू मध्ये मर्यादित न राहता इंग्रजी सह इतर भाषांमध्ये होणे ही कालाची गरज आहे जर या मदरशाचे अनुकरण देशातील इतर ठिकाणचे मदरसा यांनी केले तर भारत देश हे नक्की महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही कारण हेच विध्यार्थी पुढील काळात देशाचे भवितव्य घडविणारे आहे पुढे ते म्हणाले कि कधीही अडचणी आले तर ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन सदा सर्वदा आपल्या पाठीशी उभे राहील. अशा शब्दातून गौरव केला. या वेळी खान्काह दाऊल एहसान (भिवंडी व बंगलोर) प्रमुख मुक्ती सय्यद अबु हरैरा फैसल कास्मी, डॉ.अभिनव खरे, गुन्हे शाखा भोसरी पोलीस ठाण्याचे जितेंद्र कदम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर सह कर्नाटक राज्यातुन आलेल्या ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन चे प्रमुख पदाधिकारी दादापीर वाघमोरे, डॉ. आर. बी. कुलकर्णी, बशीर मुल्ला मोमीन साहब, आदि उपस्थित होते. पुणे जिल्हा ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन चे इम्तियाझ शेख , आमीरखान आत्तार, चंद्रशेखर पात्रे, दिपक चौगुले, चिंतन पटेल, सदस्य प्रकाश साबळे, इस्माईल शेख आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती मान्यवर युनुस खान, फारूख भाई इंजिनिअर, मौलाना अब्दुल गफार , मौलाना मिन्हाज, आफिज अल्ताफ आदि उपस्थित होते. तर मदरसाचे शिक्षकगंण विद्यार्थी सह मौलाना नईम हाफिज एजाज शिक्षिका असिफा काजी, आसिया शेख, सादिक मुजावर, सहीत हा कार्यक्रम सफल करण्यासाठी मौलाना आलिम अंसारी, मेहबूब शेख, लतीफ शेख, युनुस वालेकर, जुबेर शेख आदिनी विशेष परिश्रम घेतले.