प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
न्हावा शेवा सिएचए संघटना उरण मधील एकमेव संघटनां आहे जी संघटना संघटीत झालेल्या सिएचए बांधवाना अपघात झाल्यावर त्वरित आर्थिक सहाय्य मिळावा या एकमेव उद्धिष्ट उराशी बाळगत आज ही संघटना कार्यरत आहे या मध्ये संघटीत झालेल्या सिएचए चा नैसर्गिक किंवा अपघाती निधन झालं तर त्याच्या कुटूंबियांना 1लाख ते 2 लाख अशी मदत देण्याचं काम केलं जात आहे आज 4 वर्ष ह्या संघटनेच्या वतीने स्वर्गीय अमर पाटील वशेणी यांच्या कुटूंबीया ना 2 लाख 72 हजार तर स्वर्गीय दिनेश म्हात्रे पाले ह्याच्या कुटुंबियाना 81 हजार तसेच स्वर्गीय रमाकांत पाटील सारडे यांच्या कुटूंबियांना 1लाख 18 हजार निधी आर्थिक सहाय्य म्हनुन देण्यात आला
आता हा पैसा येतो कुठून तर या संघटनेच्या वतीने आधार चषक नावाचं क्रिकेटचे सामने भरवून हा निधी गोळा केला जातो आणि उर्वरित रक्कम संघटनेच्या सभासदा मार्फ़त जमा केली जाते आज पर्यत ज्याचे अपघात झाले आहेत आश्या महेश शिवकर केलवणे ,प्रमोद पाटील सारडे ,नवनीत पाटील सारडे आश्या सभासदांना संघटनेच्या नियमानुसार रक्कम दिली जाते ह्या संघटनेत एकूण 374 सभासद असून प्रत्येक गावा गावात गाव अध्यक्ष नेमण्यांत आला आहे आशी 32 लोकांची कमिटी कडून काम पाहिले जात आहे आज हे कार्य करत असताना 4 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि पाचव्या वर्षात पदार्पण केलं जातं आहे ही अभिमानाची गोष्ठ आहे
या वर्धापन दिनांच्या कार्यक्रमात सर्वात मोलाच सहकार्य देणारे न्हावा शेवा सिएचए संघटनेचे उपाध्यक्ष श्री.रुपेश भगत यांना चौथ्या वर्धापन दिनाचे अध्यक्ष स्थान भूषविण्याचा मान सर्वानुमेत देण्यात आला. राष्ट्रगीतने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली मिलिंद म्हात्रे ,प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालनाच काम पाहिलं सल्लागार दिपक गावंड,दूषण ठाकुर, दिनेश म्हात्रे यांनी आपली संघटनां वाढीसाठी मार्गदर्शन केले तर ज्या सीएचए याचा स्वर्गवास झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . अशा प्रकारे संपन्न झाला न्हावा शेवा सिएचए संघटनेचा चौथा वर्धापन दिन साजरा