प्रेस मीडिया लाईव्ह :
१४ ऑगस्ट २०२२ रोजी आयर्न मॅनने ऑर्गनाईज केलेली प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा कजाकिस्तान येथे पुण्यातील फिटनेस फर्स्ट इंडिया संस्थे तर्फे पूर्ण करण्याचा बहुमान चार जणांना मिळाला असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पाच स्पर्धकांनी भाग घेतला होता मात्र चार स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकले सहभागी स्पर्धक हे विविध क्षेत्रातील व विविध वयोगटातील यशस्वी व मानांकित आहेत. अशी माहिती या स्पर्धेचे प्रशिक्षक विजय गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
फिटनेस फर्स्ट इंडिया ग्रुप तर्फे प्रशिक्षक विजय गायकवाड ह्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेऊन ही स्पर्धा चार स्पर्धकांनी पूर्ण केली.पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांमध्ये स्वानंद देशपांडे व समृद्धी कुलकर्णी तसेच अर्ध आयर्न मॅन स्पर्धेत यश प्राप्त करण्यात सायली गंगाखेडकर व रवींद्र कदम या स्पर्धकांचा समावेश आहे.
क्रीडा विश्वात अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या ज्या विविध स्पर्धा आहेत त्यात आयर्न मॅन या स्पर्धेचा समावेश केला जातो. मानसिक संतुलन, शारीरिक बळ तसेच आर्थिक तयारी च्या कसोटीची ही अर्ध आयर्न मॅन व पूर्ण आयर्न मॅन असे दोन प्रकारात अशी स्पर्धा घेतली जाते. त्यासाठी ८.३० तास व १७ तास अशी अनुक्रमे काल मर्यादा असूनही ह्या सर्व स्पर्धकांनी उत्तम वेगात ही स्पर्धा वेळेपूर्वी यशस्वीरित्या पूर्ण केली.
पुण्यातून निघाल्यावर कझाकिस्तान येथे स्पर्धकांच्या सायकली पोहोचल्या नाहीत. त्यासाठी अनेक प्रयत्न करून अखेर स्पर्धे पूर्वी केवळ ८ तास ह्या सायकली स्पर्धकांच्या हाती लागल्या.हा तणाव असूनही सर्वांनी स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण आयर्न मॅन पूर्ण स्पर्धा करण्यासाठी ३.८०० मीटर पोहणे १८० किलोमीटर सायकलिंग व ४२ किलोमीटर रनिंग असे सलग रित्या केले जाते. आंतरराष्ट्रीय वाटरपोलोचे पूर्वाश्रमीचे कर्णधार स्वानंद देशपांडे यांनी ही स्पर्धा १३. २५.२३ या विक्रमी वेळेत पूर्ण केली. तर समृद्धी कुलकर्णी हिने १४.५६.१६ अशा वेळेत स्पर्धा पूर्ण केली.
अर्ध आयर्न मॅन स्पर्धा ही १.९ किलोमीटर पोहणे ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावणे अशा प्रकारात घेतली जाते ही स्पर्धा रवी कदम यांनी ०८.४२.४५ अशा वेळेत पूर्ण केली. तसेच सायली गंगाखेडकर हिने ही स्पर्धा ०६.२५.२८ या वेळेत पूर्ण केली, तसेच त्यातील ३५.१५ मिनिटे वेळेत १.९ किलोमीटर पोहणे पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धकांची पोलादी महत्त्वकांक्षा आणि अथक प्रयत्न व विजय गायकवाड यांचे उत्तम मार्गदर्शन याची उत्कृष्ट सांगड या यशस्वी स्पर्धकांना लाभान्वीत ठरली.
या स्पर्धेसाठी २०१९ पासून प्रशिक्षण व प्रयत्न सुरू होते तथापि २०२० व २०२१ ह्या वर्षी कोविड महामारी मुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. तरीही निराश न होता, चिकाटीने व संपूर्ण आत्मविश्वासाने स्पर्धकांनी हे स्वप्न पूर्ण केले.
ही स्पर्धा जिंकून अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे.भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या महोत्सवात मिळालेले हे यश म्हणजे भारतमातेच्या मुकुटावरील मानाचा तुरा आहे हे निश्चित म्हणावे लागेल.
त्या विस्तृत स्पर्धा प्रांगणात भारताचा तिरंगा ध्वज फडकविला व राष्ट्रगीत गायनाचा मान मिळाला हा आनंदाचा क्षण अनुभवला असे सर्व स्पर्धकांनी अभिमानाने सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
स्वानंद देशपांडे
9860685200