"शांतीवन नसून हे तर शांतता वन असे केले कौतुक"
प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
सिने अभिनेते श्री सयाजी शिंदे यांचे पर्यावरण प्रेम हे महाराष्ट्रामधील सर्व जनतेला माहीतच आहे. सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण क्षेत्रात काम करत असताना. वृक्ष लागवड आणि संवर्धन या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेची निर्मिती केली आणि त्यामार्फत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजारो झाडे लावली आणि त्यांचे संवर्धन ते करत आहेत. या त्यांच्या सामाजिक कार्यात अनेक संस्था त्यांना जोडल्या जातात त्यातील एक नाव म्हणजे *ऑर्लीकॉन टेक्सटाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड*. या कंपनीने त्यांच्या सी.एस.आर. निधी मधून शांतीवन येथे देशी फळं ,फुल आणि पशु पक्षांना उपयोगी 130 झाड भेट म्हणून दिली. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आज श्री सयाजी शिंदे शांतीवन नेरे येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री देवराई संस्थेचे खजिनदार सचिन चंदने IT हेड अनिकेत रणपिसे , योगेश पंदेरे,मंगेश अपराज उपस्थित होते . त्यांनी याप्रसंगी शांतीवन ऑफिस,सभागृह ,कुष्ठरोग निवारण केंद्र व आदिवासी शाळेला भेट देऊन वृक्षारोपण केले. यावेळी त्यांचे शांतीवनचे चेअरमन एडवोकेट श्री प्रमोद ठाकूर , चीफ सेक्रेटरी विनायक शिंदे ,ट्रस्टी मोतीलाल बांठिया , संजय गुळुंबकर ,नीलकंठ कोळी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना श्री सयाजी शिंदे यांनी सांगितले की "शांतीवन परिसरात आल्यावर इथला निसर्ग पाहून मनाला एक वेगळी शांतता मिळते. या वास्तूला शांतीवन न बोलता शांतता वन संबोधिले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने मानसिक शांततेसाठी या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी " असे त्यांनी आव्हान सुद्धा केले. यावेळी तिथे उपस्थित असलेले श्री.दिलीप चंदने आणि मिस निवेदिता यांनी सहयाद्री देवराई संस्थेला पुढील पर्यावरणाच्या कामासाठी विशेष मदत केली.
या कार्यक्रमासाठी परिसरातील कुष्ठरूग्ण बंधू-भगिनी आणि आदिवासी बांधव नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.