प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरढोण येथे जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणा-या मुस्लिम युवकावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद , बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आले.यावेळी पोलीस उपाधीक्षक बी.बी.महामुनी , शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यातील शिरढोण या गावातील एका मुस्लिम युवकाने आपल्या मोबाईलवरील स्टेटसवर पाकिस्तानचा ध्वज ठेवून त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहला होता.यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये , यासाठी रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी शिरढोण गावास भेट घेवून
तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेवून सर्वांनी शांतता राखण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दरम्यान ,या प्रकरणातील संशयित मुस्लिम युवकास कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मोठी मदत झाली आहे.असे असले तरी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वारंवार अशा घटना घडून देशातील कायदा - सुव्यवस्था बिघडू नये , यासाठी पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करावा ,अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमधून होत आहे.याच अनुषंगाने आज सोमवारी शिरढोणमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मोबाईलवर पाकिस्तानचा ध्वज व त्यावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणा-या मुस्लिम युवकावर कडक कारवाई करावी ,अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद , बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पोलीस उपाधीक्षक बी.बी.महामुनी , शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष बाळासो ओझा ,शहर मंञी प्रवीण सामंत, अमित कुंभार ,मेजर सुनील पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी देशात वारंवार जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजातील काही मंडळींकडून चुकीच्या घटना घडत आहेत.त्यामुळे देशाच्या एकतेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलून शिरढोण मधील संशयित मुस्लिम युवकाचे नाव जाहीर करुन त्याच्यावर कारवाई करावी ,अशी मागणी केली.यावर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सजग भूमिका घेवून कार्यरत राहिल ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
यावेळी निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात अनिल सातपुते ,सुभाष कोरे ,केदार सोमण ,मुकुंदराज उरुणकर ,तुषार बगाडे ,हर्षद सोनवले ,शरद बाहेती ,गणेश कांदेकर , रावसाहेब चौगुले , भिमराव कोकणे ,आनंदा मकोटे ,सुजित कांबळे , ऋषीकेश सासणे , संस्कार सासणे ,विनायक सासणे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा समावेश होता.