यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे ५ आॕगष्ट रोजी दिल्ली जंतरमंतरवर रासपचे राष्ट्रीय नेते व माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या नेत्तृवाखाली धरणे आंदोलन पार पडले...
प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. पावसातही महादेवजी जानकरांसह रासपचे कार्यकर्ते मागणी करीत होते. या आंदोलनाचे मुख्य नेत्तृत्व महादेवजी जानकर यांनी केले.
देशातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. काही कार्यकर्ते धनगर समाजाच्या परंपरागत वेशभुषेत होते.वेशभूषा अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी बोलताना श्री जानकर म्हणाले. या देशात पशू-प्राण्यांची सुद्धा गणना केली जाते. मग देशातील सर्व बहूजन जनतेची जातनिहाय जनगणना करण्यात सरकारला काय अडचण आहे ?
ज्याप्रमाणात लोकसंख्या आहे. त्याचप्रमाणात आरक्षण राहील. यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. पुढे असेही श्री जानकर यावेळी म्हणाले. १९३१ मध्ये इंग्रजांच्या काळात शेवटची जातनिहाय जनगणना झाली.
जातनिहाय जनगणना सहीत, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करावे व शिक्षणासह आरोग्य सुविधा देखील पुर्ण देशात पूर्णपणे निःशुल्क द्याव्यात. अशा अनेक लोक कल्याणकारी मागण्या श्री जानकर यांनी केल्या आहेत.
यावेळी रासपचे लाखो पदाधिकारी उपस्थित असताना, इत्तर पक्षातील अनेक खासदारांनी देखील उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.