शेकापने फोडली दुहेरी मालमत्ता कराची हंडी.!

 प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  दहीहंडी साजरी


प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

पनवेल  मनपाच्या अन्यायी लुटीची बेडी तोडू, चला मालमत्ता कराची हंडी सही करून फोडू !!* या घोषणेसह  आज शेतकरी कामगार पक्षा तर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खांदा कॉलनी , कळंबोली इत्यादी परिसरात पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या दुहेरी मालमत्ता कराची दहीहंडी सही करून फोडली आणि दहीहंडी च्या शुभेच्छा दिल्या.

     पनवेल महानगरपालिकेने स्थापना झाल्यानंतर एकत्रित चार वर्षाचा कर सर्व नागरिकांना लावला. परंतु सदर कर हा सिडको ने सुद्धा या अगोदर नागरिकांकडून वसूल केला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेतून नागरिकांवर लादलेला हा अन्यायकारक दुहेरी मालमत्ता कर हा रद्द करण्यात यावा आणि नागरिकांना योग्य तो करत लावावा यासाठी गेली काही वर्षे शेतकरी कामगार पक्ष विविध प्रकारे आंदोलने करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुहेरी मालमत्ता कराची हंडी सह्यांच्या रूपाने फोडून पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांचा निषेध आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या आगळावेगळा दहीहंडीचे नियोजन करण्यात आले असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. 

      यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री.बाळाराम पाटील साहेब , शेकाप जिल्हा चिटणीस श्री गणेश कडू, शेकाप जिल्हा सहचिटणीस श्री. प्रभाकर कांबळे, महादेव वाघमारे कार्याध्यक्ष शेकाप श्री गणेश पाटील (मा . उपनगराध्यक्ष प म पा ),सौ .सारिका अतुल भगत (मा.नगरसेविका प म पा), श्री अनिल बंडगर (शहर अध्यक्ष), श्री किरण घरत(उपाध्यक्ष),, श्री योगेश कोठेकर (कार्याध्यक्ष), श्री सागर भडांगे , श्री संतोष सावंत , श्री श्याम लागडे, श्री रोहन वटकर,श्री अतुल भगत

 सौ किशोरी पाटील(महिला उपाध्यक्ष ) , सौ नलिनी जाधव , सौ निर्मला गुंडरे , श्रीमती आश्विनी जोगदंड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post