प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच 2022-25 या कालावधीसाठी पदाधिकारी निवडणूक संपन्न झाली.या निवडणुकीत कोकण विभागातून महिला उपाध्यक्ष म्हणून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी रायगड जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व शासकीयअधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.-रायगडचा युवक