या सगळ्या प्रकरणा संदर्भात योग्य कारवाई केली जाईल आणि त्यांच्या परवान्या संदर्भात देखील कारवाई केली जाणार ..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख ;
रुबी हॉस्पिटल मध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उजेडात आली होती. त्यानंतर या हॉस्पिटलची चौकशी सुरु होती. या प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सभागृहात गदारोळ निर्माण झाला. पुणे रुबी हाॅल क्लिनिक किडनी प्रत्यारोपण प्रकरणी इनामदार हाॅस्पिटल, पुणे आणि ज्युपिटर हाॅस्पिटल ठाणे याचा सहभाग असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. या सगळ्या प्रकरणा संदर्भात योग्य कारवाई केली जाईल आणि त्यांच्या परवान्या संदर्भात देखील कारवाई केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे
मे महिन्यात हे प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यानंतर आता 3 महिन्यांनतर देखील कारवाई झाली नाही त्यामुळे विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. किडनी प्रत्यारोपणाचं प्रकरण गंभीर आहे. एक महिन्यात अंतिम अहवाल देऊ आणि ज्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्यार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
या सगळ्या प्रकरणात हॉस्पिटलचा सहभाग असेल तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल मात्र डॉक्टरांचा सहभाग असेल तर त्या डॉक्टरांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत सर्व प्राथमिक माहिती बाहेर आली आहे. सगळी चौकशी झाली की योग्य ती कारवाई करुन या प्रकरणा ज्यांंचा सहभाग असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.