वेदांत सांस्कृतिक मंच तर्फे निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान व राष्ट्रवंदना कार्यक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ( प्रतिनिधी )
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वेदांत संस्कृतिक मंचातर्फे कर्वेनगर येथे वास्तव्य असलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सत्कार आणि *राष्ट्र वंदना* हा देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील युवा वैद्यांनी साकारलेली देशभक्तीपर गीत्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली होती.वैद्यकीय क्षेत्रातील संगीत उपासकांनी जोशपूर्ण गीतांचा हा कलाविष्कार सादर केला.वैद्य सुश्रुत गाडगीळ,देवाशीष उंब्रजकर,शुभदा कुलकर्णी, शमीका खापरे,कल्याणी संत,प्रतीक्षा वहातुळे,हे कलाकार गायक होते तर त्यांना संवादिनी केतन कुर्तकोटी,सिंथेसायझर वर अथर्व जोशी,आशुतोष जातेगावकर यांचे बासरी,ऋटेश दामले, पखवाज वर आशुतोष जिरे,तालवाद्य वर शौनक साने हे होते.कर्वेनगर मधील वेदांत मंगलम सभागृहात हा कार्यक्रम झाला.
माजी लष्कर अधिकाऱ्यांचा सन्मान
कर्वेनगर स्थित माजी लष्करी अधिकारी एअर मार्शल प्रदीप बापट, एअर व्हाइस मार्शल जयंत इनामदार कमोडोर उदय तळवेलकर, चीफ पेटी ऑफिसर सुमेशकुमार बेरी, मेजर जनरल सोहोनी,मेजर जनरल संजय भिडे ,ब्रिगेडिअर प्रकाश भट, कर्नल बसरगेकर, कर्नल शशांक उमाळकर, लेफ्टनंट कर्नल वैद्य, मेजर मिलिंद वाठारे DRDO मधील असिस्टंट डायरेक्टर अनिल मोरगावकर इत्यादींचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी,कर्वेनगर मधील माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी,शिवराम मेंगडे ,स्वप्निल दुधाने,कुलदीप व मिताली सावळेकर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी जोशी यांनी केले.विनायक बेहेरे, सतीश आठवले,सतीश घारपुरे,रश्मी तुळजापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आयुर्वेदिक वैद्य होणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा वाद्यवृंद बसविला असून त्यात मराठी,हिंदी,कोकणी भाषेतील देशभक्तीपर गीते सादर केली.