रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन कडून आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कवी,गीतकार,पटकथा लेखक, निर्माता शैलेंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ' शैलेंद्र -जनमनाचा कवी ' हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गांधीभवन, कोथरुड येथे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे.
श्रावणरंग निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना सागर अत्रे यांची असून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचे माजी अध्यक्ष शैलेश गांधी हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
हिंदी चित्रपट श्रुष्टीला पडलेले स्वप्न
शैलेंद्र - कवी, गीतकार, पटकथा लेखक, निर्माता.. हिंदी चित्रपट श्रुष्टीला पडलेले स्वप्न. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते 60 च्या उत्तराधापर्यंत भाषा, संस्कृती आणि सभ्यता आपल्या लिखाणातून सतत जोपासत राहिलेला, भारतीय भाषेतील जनकवी. 'शैलेंद्र - जनमनाचा कवी' हा द्रुक श्राव्य कार्यक्रम केवळ गाणी घेऊन न येता, त्याचं साहित्य आणि कलाकृतीचा जन्म यावर भाष्य करतो. 800 हुन अधिक काव्यातून, गीतातून, मांडणीतून या कलाकाराने चितारलेल्या सोनेरी आणि वास्तवदर्शी चरित्रपटाचा त्याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने हौशी कलाकारांनी मांडलेला हा संगीतपट आहे.