उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद सोपवण्याची दाट शक्यता

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चूरशीचा सामना बघायला मिळू शकतो.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अन्वरअली शेख :

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद सोपवण्याची दाट शक्यता आहे.या बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. काल पुण्यात आपल्या विविध मागण्यांसाठी भेट घेण्यासाठी आलेल्या बावळेवाडीच्या शिष्टमंडळासोबत बातचीत करतांना चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे संकेत दिले. तुम्ही आता पुढे व्हा अन् तुमच्या पालकमंत्र्यांशी बोलून घ्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा केला.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पुण्यातील राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पुण्याचे पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. आणि असे झाल्यास राष्ट्रवादीची चिंता निश्चितच वाढवणारी आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चूरशीचा सामना बघायला मिळू शकतो. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि फडणवीस यांच्यात देखील आगामी काळात चुरस पहायला मिळेल. 

Post a Comment

Previous Post Next Post