प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दिनांक ८ ऑगस्ट २०२२ :संपूर्ण भारतामध्ये सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने रेंजहिल्स सेकंडरी स्कूल, खडकी, पुणे २० या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रेंजहिल्स विभागात राष्ट्रीय एकात्मतेची प्रभात फेरी काढली.
विद्यार्थ्यांनी यावेळी भारत देशातील विविधतेतील एकता दर्शविणारे पोशाख परिधान केले.
प्रभात फेरी संपल्यानंतर विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. कदाचित या माध्यमातून" हम सब एक है" हा संदेश असावा.
याप्रसंगी या रॅलीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. विश्वास शेलार यांनी केले. त्यावेळी संजय गायकवाड उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक श्री. रामदास जगताप यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र व नागरिक या विषयावर प्रबोधन पर मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये रेंजरहिल्स शाळेतील शिक्षक श्रद्धा बागडे , श्रुती कदम, अनघा सोनवणे, प्रमिला नारायणे, आर.टी.कांबळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी गौरीशंकर भोसले , किशोर राऊत, संगीता कांबळे, गीता महाले यांनी सहभाग घेतला होता.