"केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी हवी असेल तर अर्ज करु शकता..." , निलेश राणेंची दीपक केसरकरांना ऑफर




प्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील

 नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!', असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय. दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. निलेश राणेंनी तर आक्रमक शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

निलेश राणेंचं ट्विट काय..?

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!', असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय.

Post a Comment

Previous Post Next Post