प्रेस मीडिया लाईव्ह :
काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक कधी होणार याची चर्चा सुरु होती. आता निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. 17 ऑक्टोबरला मतदान पार पडेल तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सोनिया गांधी व्हिडोओ कॉन्फरन्सिंगद्वारा उपस्थित होत्या. तब्येतीच्या कारणास्तव सोनिया गांधी सध्या परदेशात असून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघंही सोनिया गांधी यांच्याबरोबर परदेशात आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक
22 सप्टेंबर - अधिसूचना24 सप्टेंबर - नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख
30 सप्टेंबर - नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख
17 ऑक्टोबर - मतदान
19 ऑक्टोबर - मजमोजणी