राष्ट्रवादी युवक काँग्रेस--चिखली, चिंचवड मध्ये हर घर तिरंगा मोहीम



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिंचवड-स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  चिखली, कुदळवाडी,शाहूनगर,पवारवस्ती येथील नागरिकांना घरोघरी मोफत तिरंगा वितरण करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संदीप गुप्ता,ओमकार नागटिळक,नागेश कवडे यांनी 150 घरामध्ये तिरंगा वितरण केले.

या देशातील तरुण पिढीला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लाखो शहिदांच्या समर्पणाची जाणीव निर्माण होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस संपूर्ण शहरात हरघर तिरंगा मोहीम राबवत आहे,असे दीपक गुप्ता यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post