चिखली कुदळवाडी कचऱ्याचे ढीग स्वछता मोहीम राबवा--दीपक गुप्ता



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिंचवड-कुदळवाडी चिखली परिसरातील सेवा रस्त्याच्या कडेला गेले काही आठवड्या पासून कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे , दुर्गंधीयुक्त कचरा यामुळे मच्छरांचे साम्राज्य तयार झाले आहे ,  सर्दी ,पडसे, खोकला, ताप यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या बाबत मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष लक्ष देऊन कुदळवाडीत औषध फवारणी आणि औष्णिक धुकीकरण करुन  स्वछता अभियान राबवावे , अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी प्रशासनाकडे केली आहे.

1 Comments

Previous Post Next Post