पेठ वडगाव, सादळे मादळे, मौजे तासगाव येथे वृक्षारोपण : १०० सदस्यांच्या प्रत्येकी १०० रूपयांतून उपक्रम
पेठवडगाव : माणसाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी निसर्गाचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. हे ओळखून पेठ वडगावातील पर्यावरणप्रेमी योग सेवा फौंडेशनने 'झाडांची भिशी' हा उपक्रम सुरु केला आहे. यातून पेठ वडगाव शहरात वृक्षारोपणासाठी येणारा खर्च केला जाणार आहे. याला पर्यावरणप्रेमीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील पर्यावरण रक्षण व सामाजिक कामात पुढाकार घेत अस योग सेवा फौंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव यांनी हा उपक्रम पेठ वडगाव शहरात सुरु केला आहे. यामध्ये शंभर सदस्य संख्या नुकतीच पूर्ण झाली. निसर्ग रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही सर्वांची जबाबदारी या संकल्पनेतून सदस्यांच्या शंभर रुपयांप्रमाणे दर महिन्याला जमा होणाऱ्या या भिशीच्या रकमेतून वडगाव शहरात वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान, पूरग्रस्त व कोरोना काळात मदत वृक्ष संवर्धनासाठी येणारा खर्च केला जाणार आहे. योग सेवा फाऊंडेशनकडून आतापर्यंत सादळे मादळे येथील सिद्धोबा मंदिर परिसरात ११०० झाडे ठिबकसह लावलेली आहेत तर त्या वृक्ष रोपांचे संवर्धन करत आहेत. अनेक युवक या माध्यमातून निसर्गसेवा करत आहेत.फौंडेशनकडून सामाजिक कामातही सक्रीय सहभाग घेवून कोविड काळात कोरोना रुग्णांना तसेच पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला होता.या फौंडेशनने रक्तदान शिबिर घेतले
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन महत्त्वाचे : राजेंद्र जाधव
पर्यावरण रक्षण म्हणजे फक्त झाडे लावणे असे होत नाही. वृक्षरोपे लावल्यानंतर ती जगविणे महत्त्वाचे आहे. आपले गाव स्वच्छ व सुंदर करायची जबाबदारी आपलीच आहे. दररोज एक तास पर्यावरण रक्षणासाठी देवून आपल्या गावची सेवा घडणार आहे. समाजातील सर्व घटकांनी पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनासाठी गावच्या स्वच्छतेसाठी हातभार लावणे आदी कामे कर्तव्य समजून केल्यास आपल्या गावची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून घडेल.. आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध करण्यासाठी मदत केली जाते. तसेच स्वच्छता मोहीमेतही नेहमी सहभाग मौजे तासगाव येथील १७एकरमधील पाच हजार देशी झाडे उन्हाळ्यात योग सेवा फौंडेशन व निसर्गप्रेमी ग्रुप व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व झाडे संगोपन केली आहेत. श्री रविशंकर गुरूदेव यांच्या आशिर्वादाने संस्था करत असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले.