# RAMDAS ATHAWALE#
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न मिळण्यासाठी पंतप्रधानांची आठवले भेट घेणार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली दि. 1 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा मरणोत्तर भारतरत्न 'किताबाने गौरव व्हावा या मागणीसाठी गृहमंत्री अमित शहा यांची मी भेट घेतली होती आता याच मागणीसाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन ना.रामदास आठवले यांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन येथील सभागृहात जनकल्याण समिती तर्फे समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ना.रामदास आठवले बोलत होते.
यावेळी विचारमंचावर माजी आमदार राम गुड्डील्ले ; केदारनाथ मंदिराचे पुजारी डॉ शिवलिंग शिवाचार्य ;व्ही व्ही सदामते; मधुकर सोनवणे;दिलीप सोळसे;श्रीमती शारदा डोलारे; विनोद जाधव;धनंजय सोळसे; गंगाधर हिवाळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सर्जेराव जाधव यांसह विविध मान्यवरांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही मात्र त्यांच्या ठायी असणाऱ्या उपजत ज्ञान आणि लेखन प्रतिभेमुळे ते जागतिक दर्जाचे साहित्यसम्राट ठरले.त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास होता.त्यामुळे आंबेडकरी चळवळ मोठी व्हावी अशी त्यांची ईच्छा होती.त्यामुळे जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव ही अजरामर कविता लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना लिहिली तीच प्रेरणा घेऊन बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
मातंग समाज आता खूप जागृत झाला आहे. लढाऊ आहे.चळवळ करत आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची जयंती मोठया प्रमाणात साजरी होत असून अनेक ठिकाणी अण्णा भाऊंचे पुतळे उभे राहत आहेत असे ना. रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइं चे माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि महाराष्ट्र अध्यक्ष भुपेश थुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख