लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक \अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांच्याकडून घरोघरी राष्ट्रध्वजाचे वितरण



प्रेस मीडिया लाईव्ह :

 नवी मुंबई :  देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय पातळीवर तसेच व्यक्तिगतरित्या ‘हर घर तिरंगा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक \ अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांच्यांकडून नेरूळ पश्चिमला सेक्टर 10,20,20ए परिसरात घरोघरी जावून राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात येत आहे.

गुरूवारी दिवसभरात 400 सदनिकांमध्ये जावून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक \ अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी राष्ट्रध्वजाचे वितरण केले असून दोन दिवसामध्ये सेक्टर 10,20,20A परिसरातील सर्वच घरांमध्ये अजून पाचशे राष्ट्रध्वजाचे वितरण करणार असल्याची माहिती लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक \ अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी दिली. या अभियानात विरेंद्र म्हात्रे यांच्यासोबत राष्ट्रध्वज वितरण अभियानात लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई च्या सदस्यांनि मेहनत घेतली आहे. प्रभागातील प्रत्येक घरामध्ये तिरंगा फडकावून राष्ट्राभिमानाची भावना ज्वलंत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे विरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post