मिरजेत काँगेसच्या वतीने मोठ्या उत्साहात आझादी गौरव पदयात्रा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज प्रतिनिधी  : धनंजय हलकर (शिंदे)

मिरज, दि. १४ : मिरज शहर काँग्रेस व मिरज ग्रामीण काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.

 या पदयात्रेचे आयोजन मिरज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी केले होते. सकाळी दहा वाजता लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला माजी महापौर किशोरदादा जामदार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शास्त्री चौकातून गौरव यात्रेची सुरुवात झाली. गौरव यात्रा जवाहर चौक, किसान चौक महाराणा प्रतापसिंह चौक, सराफ कट्टा मार्गे गणेश तलाव आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गौरव यात्रेची सांगता करण्यात आली. 

यात्रेत डॉ. सिकंदर जमादार, मिरज ग्रामीणचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, नगरसेवक करण जामदार, सभापती अनिलदादा अमटवणे, सुभाष खोत, तानाजी पाटील, अशोकसिंग राजपूत ,धनराज सातपुते ,धनंजय भिसे, शहर उपाध्यक्ष योगेश जाधव, ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश देसाई, अमोल पाटील, अफजल बुजरुक, आयुब  निशाणदार, वसीम रोहिले, सचिन जाधव, अजित दोरकर, ॲड. बिल्कीस बुजरूक, कपिल कबाडगे, बबलू मेंढे, विनायक मेंढे, इजाज शेख, सयाजी म्हेत्रे, मुस्तफा बुजरूक, अनिकेत गायकवाड, यासीन गोदड, शकील गोदड, सुनील पाटील, सुलेमान मुजावर, सुनील गुळवणी, तेजस धुळूबुळू, आरिफ मुजावर, इराप्पा नाईक, डॉ. प्रताप भोसले, अर्जुन खोत, अरूण गवंडी, बसगोंडा पाटील व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

-----

Post a Comment

Previous Post Next Post