प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मा सरपंच संदीप सुदाम मुंडे यांचा 5 ऑगस्ट रोजी वाढदिवस मोठ्या थाटामाटात व विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला .त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून सम्यक सामाजिक संस्था रसायनी या सामाजिक संस्थेच्या वतीने माझगाव येथील ग्रामीण भागातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेतील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप करण्यात आले
यावेळी मा सरपंच संदीप मुंडे यांना वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व तस्वीर भेट देवून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश शेठ गायकवाड व मा. सरपंच संदीप मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी मा सरपंच संदीप मुंडे व उमाताई मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा सांगत रसायनी परिसरातील त्यांच्या कार्याचा ज्येष्ठ समाजसेवक व सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ गायकवाड यांनी गौरव केला त्यावेळी त्यांनी सांगितले की शाळेचे परिस्थिती पाहता येतील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसाठी मदत करावी या शाळेत गोरगरीब व आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणे शिकत असल्यामुळे त्यांना शैक्षणिक कार्यात मदत करणे गरजेचे आहे असे सांगितले यावेळी मा सरपंच संदीप मुंडे यांनी या शाळेला सर्व परीने मदत करण्याचे आश्वासन दिले
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व सम्यक सामाजिक संस्थेचे पदाधिकारीअजित दादा कडलक तायडे सर गणेश जावळे महेंद्र जाधव सामाजिक संस्थेचे सचिव दीपक इंगळे बबनदादा पाटील नरेश पाटील किशोर पाटील विनायक गायकवाड राधेश्याम चौधरी अविनाश कांबळे राहुल इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कांबळे यांनी केले