प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
2 ऑगस्ट 2022 चा शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन वडखळ येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. त्या नुसारच शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल आणि उरण तालुक्यातील पुरोगामी युवक संघटनेच्या युवकांनी विरोधी पक्ष नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंबर कसली आहे. यापुढील होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक मुख्य आणि मोठा घटक म्हणून आपले अस्तित्व यापुढेही राहिले पाहिजे या संदर्भात शेतकरी कामगार पक्षातर्फे विभागवार बैठका घेण्याचे नियोजन केले गेले आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या संघटनेमध्ये काही संघटनात्मक पदांची निर्मिती करत असतानाच या पदावर असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणातही पुढाकार घेतला गेला पाहिजे असे मत प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले. नवीन कार्यकर्ते आपल्या सोबत येण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध मार्गदर्शन शिबिरे आयोजित करा जेणेकरून सध्याच्या परिस्थितीमध्ये जी गरज युवकांना आहे ती आपण जर पूर्ण करू शकलो तर निश्चितच यापुढेही शेकाप रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष राहील यात शंका नाही असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
याप्रसंगी माजी.नगरसेवक गोपाळ भगत, माजी नगरसेवक रवींद्र भगत, शेकाप नेते विजय भोईर, संजय सरगर आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.