प्रेस मीडिया लाईव्ह :
बानू नदाफ
आज देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सगऴीकडे साजरा होत असताना रॉबिनहूड आर्मी कोल्हापूर यांच्या वतीने सुद्धा छोट्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यामुळे देशप्रेमी वातावरण सगळीकडे तयार झाले होते. RHA चा वतीने अंध ,अपंग आणि तृतीयपंथी व समाजातील अनेक गरजु लोकांना अन्नधान्य किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. देशा मध्ये जवळपास ४०० शहरामधे एकाचवेळी अशाप्रकारचा कार्यक्रम पार पडला. जवळपास 75 लाख लोंकाना या मधुन मदत देण्यात आली आहे.
देशाचा स्वातंत्र्यदिन हा सुट्टी म्हणून कुटुंबासह फिरायला गेलेल्या लोकांना अंध आणि अपंग व्यक्तींनी तिरंग्याला सलामी देऊन चपराकच दिली.
शेवटी काय अंध बाधंवाना तिरंगा कसा आहे व अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन कसा आहे हे पहायला सुद्धा डोळे नाहीत त्यांनी आज भारताचा तिरंगी झेंड्याला दिलेली सलामी पाहुन भारताचा या तिरंगी झेंड्याला सुद्धा वाटले असेल निदान यांच्या साठी तर फडफडत राहावेच लागेल .