प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : कोल्हापूर जिह्याला गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगेच्या पातळीत सहा फुटांची वाढ होऊन, एकूण 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिह्यातील राधानगरीसह सर्व प्रमुख धरणे व मध्यम, लघु प्रकल्प 80 ते 100 टक्के भरलेले आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवडय़ांपासून पावसाने दडी मारल्याने तसेच कडकडीत उन्हामुळे शेती पिके करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, या पावसाने पिकांनाही तारल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिह्यात गेल्या चोवीस तासांत केवळ 2.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 19.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. 24 तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी 6 फुटाने वाढली असून, काल 14 फूट असलेली पंचगंगेची पातळी सायंकाळी चारच्या सुमारास 20 फूट झाली होती. तर, 12 बंधारे पाण्याखाली गेले होते.
कोल्हापूर जिह्यात 4 मोठे, 12 मध्यम, तर 60 लघु आणि एक उपसा सिंचन योजना असे एकूण 77 धरण प्रकल्प आहेत. राधानगरीसह प्रमुख धरणे सध्या 80 ते 100 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी 1 जून ते 7 ऑगस्ट या काळात राधानगरी धरण क्षेत्रात 2 हजार 461 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अलमट्टी धरण 92 टक्के भरले; विसर्ग थांबविला
n यंदा पाटबंधारे विभागाच्या योग्य समन्वयातून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सुरुवातीपासून विसर्ग करण्यास भर देण्यात आला. परिणामी पंचगंगेसह जिह्यातील नद्या इशारा पातळीपर्यंत नियंत्रित ठेवण्यात यश आल्याने यंदा महापुराचा फटका बसला नाही. 123.01 टीएमसी क्षमतेच्या अलमट्टी धरणात सध्या 112.945 टीएमसी असा 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. 30 हजार 138 क्युसेक पाण्याची आवक होत असली, तरी शुक्रवारपासून या धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे
धरण पाणीसाठा विसर्ग (टक्के) (क्युसेक)
राधानगरी 82.05 1600
तुळशी 81.14 00
वारणा 82.29 1500
दूधगंगा 75.36 00
कासारी 78.54 550
कडवी 86.7 180
कुंभी 79.83 00
पाटगाव 84.14 00
चिकोत्रा 85.86 00
चित्री 95.40 00
जंगमहट्टी 100 99
घटप्रभा 900 00
जांबरे 100 146
आंबेओहोळ 88.23 15