गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  (जिमाका): गणेशोत्सव मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी व मंडळाची गैरसोय टाळण्यासाठी  नोडल अधिकारी म्हणून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती रु.रु. कोरे-बारवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41- क (तात्पुरती परवानगी) अन्वये अर्ज विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणारी परवानगी गतीमान करण्याबाबत तसेच परवानगीसाठी मंडळांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता निम्नस्वाक्षरीकार यांच्या कक्षात सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त रु.र.कोरे यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post